“चंद्रावर पाणी असल्याचं आपणच जगाला सांगितलंय. त्यामुळे आपल्याला मागे वळून पाहायचं नाहीय. आपण नक्कीच यशस्वी होऊ,“ असा संदेश पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना दिला.
भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे त्याच्या मून लँडर ’विक्रम’चं चंद्रावर उतरणं. साऱ्या देशाचं लक्ष या ऐतिहासिक घटनेकडे असत